घरCORONA UPDATEस्टडी फ्रॉम होम : लॉकडाऊनमध्ये शाळा- क्लासेसकडून ऑनलाईन लेक्चर 

स्टडी फ्रॉम होम : लॉकडाऊनमध्ये शाळा- क्लासेसकडून ऑनलाईन लेक्चर 

Subscribe

विद्यार्थ्यांचा अभ्यासात कुठेही खंड पडू नये, यासाठी अनेक शाळा व क्लासेसने ऑनलाईन लेक्चर सुरू केलं आहे.

कोरोनामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला असताना याचा परिणाम शाळा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर झाला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यासात कुठेही खंड पडू नये, यासाठी अनेक शाळा व क्लासेसने ऑनलाईन लेक्चर सुरू केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी ऑनलाइन लेक्चरच्या माध्यमातून  घरात बसूनच अभ्यासाचे धडे गरवित आहेत. त्यामुळे सतत मोबाईल, कॉम्प्युटरवर गेम्स खेळणारे विद्यार्थी अभ्यासात गुंतल्याचे दिसून येत आहेत.
मुंबई, ठाणे आदी परिसरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे लॉकडाऊन अजून किती वाढेल, याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे अनेकजण हे वर्क फ्रॉम होमचा वापर करीत आहेत. मार्च महिन्यापासूनच कोरोनाचा प्रार्दुभाव जाणवू लागल्यानंतर त्याचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्यावेळीच पहिली ते नववीपर्यंतच्या विद्याथ्यांच्या परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी कमी वेळ मिळत असल्याने खासगी क्लासेसचे लेक्चर एप्रिल महिन्यातच सुरू होतात. पण लॉकडाऊनमुळे आता क्लासेसनेही ऑनलाईन लेक्चरला सुरूवात केली आहे. डोंबिवलीतील फॉरवर्ड क्लासकडूनही दहावीतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर सुरू झाले आहेत. दररोज दीड तासाचा लेक्चर घेतला जात आहे, त्यानंतर आठवड्यातून एकदा ऑनलाइन परिक्षा घेतली जात आहे. झूम अँपच्या माध्यमाचा वापर करीत विद्यार्थ्यांचे लेक्चर होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जरी असला तरीसुध्दा अनेक दहावीतील विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पुस्तक डाऊनलोड करून मुले अभ्यास करताना दिसत आहेत.
तसेच काही शाळांनीही ऑनलाईन लेक्चर सुरू केले आहे. कल्याणच्या मेरिडियन स्कूल या इग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेने  ज्यू. के. जी  ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शनिवार ६० मिनिटाचा एक लेक्चर्स असे तीन लेक्चर्स शाळेने सुरु केले आहे. ऑनलाइन लेक्चरला विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाळेचे संचालक डॉ. विनोद कुलकर्णी व मुख्याध्यापिका भाग्यश्री पिसोळकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा आणि विद्यार्थी यांचा संपर्क होत नसल्यामुळे प्रत्येकजण वर्क फ्रॉम होम याचा पुरेपूर फायदा सर्वांना व्हावा, तसेच विद्यार्थ्यांचे ही अभ्यासामध्ये कोणते ही नुकसान होऊ नये. म्हणून आम्ही शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या संगनमताने हा उपक्रम सुरू केला असून त्याला विद्यार्थ्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे डॉ. विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -