Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Subscribe

कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित बैठकीत दिल्या.

मुंबई : सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित बैठकीत दिल्या. (online permission through ‘one window’ for filming in maharashtra; chief minister devendra fadnavis decision)

देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यांतर विविध खात्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, सांस्कृतिक कार्य, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच वस्त्राद्योग विभागाचा सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना विविध सूचना केल्या.

हेही वाचा – Devendra Fadnavis : रस्ता सुरक्षेसाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्यांचे कार्य सर्व शाळा, महाविद्यालयांपर्यत पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्यात यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून त्यांच्या जीवन कार्यावर एका चांगल्या व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी. या चित्रपटासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येईल. मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे. यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. ‘हर घर संविधान’ अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजे, अशाही सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

स्मार्ट रेशनकार्डसाठी स्थलांतरित कामगारांना प्राधान्य द्या

राज्यातील स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

हेही वाचा – Shivaji Maharaj Statue : लडाखमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद; स्थानिक नाराज

अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत. सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहनांचे जिओ टॅगिंग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण, उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar