Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Online Scams : व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये कोट्यवधीची फसवणूक; दोन भावांवर गुन्हा...

Online Scams : व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये कोट्यवधीची फसवणूक; दोन भावांवर गुन्हा दाखल

Subscribe

Online Scams : महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Andhari Tiger Reserve) ऑनलाइन बुकिंगमध्ये 12 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगचे काम दोन भावांच्या भागीदारीत चालणाऱ्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनला ऑनलाइन बुकिंगचे काम देण्यात आले. मात्र त्यांनी रक्कम परत न केल्यामुळे त्यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online Scams Crores fraud in online booking of tiger reserve A case has been registered against two brothers)

हेही वाचा – फुले-शाहू-आंबेडकर पूज्यनीयच, मात्र सरस्वतीही…; दादा भुसेंचे भुजबळांच्या उपस्थितीत वक्तव्य

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) ऑनलाइन बुकिंगचे कंत्राट दोन भावांच्या भागीदारीत चालणाऱ्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनला ऑनलाइन बुकिंगचे काम देण्यात आले. मात्र त्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि आरोपी रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही भाऊ चंद्रपूर शहरातील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी (18 ऑगस्ट) रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींनी करारातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून ऑनलाइन बुकिंगमधील रक्कमेत अपहार केला आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुक्त शिक्षणही महागले; मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ, आणखीही काही अटी

काय आहे प्रकरण?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये येण्यासाठी ऑनलाइन तिकिट बुकिंगची जबाबदारी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हिटी सोल्युशनकडे देण्यात आली होती. करारानुसार एजन्सीने मागील 3 वर्षात 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा केला. मात्र उर्वरीत रक्कम देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही एजन्सीने ही रक्कम दिली नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अखेर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांनी एजन्सीविरोधात 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली.

- Advertisment -