मुंबई : शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये एक हजारांहून अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार होती. मुंबई आणि परिसरात जवळपास पावणेपाचशे केंद्रांपैकी केवळ 12 केंद्रे सुरू झाली असल्याचे सांगत ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा – बेरोजगार तरुणांची सरकारकडून होतेय फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दोन महिन्यांपूर्वी ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयांमध्ये ‘खोके’ सरकारचा बेजबाबदार कारभार पाहायला मिळाला होता. या रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात नवजात बालकेही होती. या घटनेमुळे मिंधे-भाजपा सरकारचा असंवेदनशील कारभार जनतेसमोर आला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयांमध्ये खोके सरकारचा बेजबाबदार कारभार पाहायला मिळाला होता. ह्या रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात नवजात बालकही होती. ह्या घटनेमुळे मिंधे-भाजपचा असंवेदनशील… pic.twitter.com/xXPlla7UtQ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 8, 2023
सगळीकडून टीका झाल्यामुळे खोके सरकारने मोठा गाजवाजा करत राज्यातील महापालिकांमध्ये 1 हजार 325 ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ उभी करण्याचा निर्णय घेतला. त्याला दोन महिने उलटून गेले तरी ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ उभी राहिलेली नाहीत. मुंबई महानगर क्षेत्रातील आठ महापालिकांमध्ये 477 केंद्रे उभी राहणार होती. त्यातील तीन महापालिका क्षेत्रांमध्ये केवळ 12 केंद्रे सुरू झाली असून पाच महापालिकांमध्ये एकही केंद्र उभे राहिलेले नाही. हा खोके सरकारचा कारभार असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – अवकाळी असला तरी ठरणार लाभदायी, पावसाबाबत हवामान खात्याची महत्त्वाची माहिती
जागेची अडचण, निधीचा अडसर, मनुष्यबळाची कमतरता अशा अनेक समस्या आहेत आणि त्या सरकारला अद्यापही सोडवता आलेल्या नाहीत. दोन महिन्यांमध्ये ही ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ उभी राहतील, असा दावा घटनाबाह्य सरकारनं केला होता पण तो फोल ठरलाय. ही ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ आता केवळ कागदावरच राहिली आहेत, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला आहे.