मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार, आशिष शेलारांचं मोठं विधान

भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली.

fight against corruption has begun bjp Ashish Shelar criticizes maha vikas aghadi government
भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर निशाणा

मुंबईः पुन्हा एकदा नवीन दमाने मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणालेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही येवोत, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या आणि मुंबईच्या जनतेतील मनातली इच्छा पूर्ण करणाऱ्या या स्वरूपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरलाय. त्याच्या रचना लावल्या आहेत. काही गोष्टींची उजळणी केलीय. काही आगामी कार्यक्रमांची तयारीसुद्धा सुरू झालीय, असंही आशिष शेलारांनी सांगितलंय. भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळ जवळ 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या संपूर्ण साडेतीन तासांमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या कामासाठी आज उपस्थित राहू शकलेले नाहीत, असंही आशिष शेलारांनी सांगितलंय.

त्यांच्याशी व्हर्च्युअली संपूर्ण चर्चा केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही येवोत, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या आणि मुंबईच्या जनतेतील मनातली इच्छा पूर्ण करणाऱ्या या स्वरूपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरलाय. त्याच्या रचना लावल्या आहेत. काही गोष्टींची उजळणी केलीय. काही आगामी कार्यक्रमांची तयारीसुद्धा सुरू झालीय. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नवीन दमाने मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली, असंही जाता जाता आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुकीबाबत मुंबईमध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक झाली. शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं या बैठकीत पाहायला मिळालं. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलंय. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.


हेही वाचाः ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना रंगात