Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी BTC उमेदवारांनाच शिक्षक होता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

BTC उमेदवारांनाच शिक्षक होता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

बीएड (B.Ed) आणि बीटीसी (BTC) करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता केवळ BTC उमेदवारांनाच शिक्षक होता येणार आहे. मात्र B.Ed करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक होता येणार नाही. भारत सरकारनं दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे.

बीएड (B.Ed) आणि बीटीसी (BTC) करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता केवळ BTC उमेदवारांनाच शिक्षक होता येणार आहे. मात्र B.Ed करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक होता येणार नाही. भारत सरकारनं दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे. (Only BTC candidates can become teachers a major decision of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या नियमामुळे प्राथमिक शिक्षक भरतीतून बीएड उमेदवार बाहेर पडतील, तर BTC उमेदवारांची भरती केली जाईल. B.Ed विरुद्ध BTC DElEd (BTC/DElEd) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा जुना निर्णय कायम ठेवला आहे. तसेच, प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी B.Ed केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे प्रथमिक शिक्षक भरतीसाठी फक्त BTC उमेदवार पात्र ठरतील. हा निर्णय बीएड करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

राजस्थान उच्च न्यायालयाने याआधी हा निर्णय दिला होता. आता भारत सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत कायम ठेवण्याचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

बीएड पदवी प्राप्त सर्व उमेदवार आता प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यास अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे बीएड पदवीधर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होऊ शकणार नाहीत. सध्या तरी हा निर्णय पुढे येणाऱ्या सर्व भारतीयांसाठी वैध असेल. बीएड आणि बीटीसी उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा स्पष्ट अर्थ म्हणजे आता बी.एड उमेदवारांना यापुढे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येणार नाही आणि फक्त बीटीसी उमेदवारांनाच प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक बनता येईल.


हेही वाचा – ब्रिटिशांपेक्षा भयंकर तुमचे कायदे; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -