घरताज्या घडामोडीवारकऱ्यांसाठी खुशखबर! विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची गरज नाही

वारकऱ्यांसाठी खुशखबर! विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची गरज नाही

Subscribe

पंढरपूराच्या विठ्ठल रुक्मिणीच दर्शन आता सर्वसामान्यांसाठी खुल करण्यात आल आहे.

महाराष्ट्राच्या तमान वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पंढरपूराच्या विठ्ठल रुक्मिणीच दर्शन आता सर्वसामान्यांसाठी खुल करण्यात आल आहे. त्यामुळे आता दर्शनाकरता ऑनलाईनची गरज नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरकरांना दररोज सकाळी ६ ते ७ यावेळेत दर्शन घेता येणार आहे. ही मुभा येत्या ५ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मंदिराच्या प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्वच मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने भाऊबिजेच्या शुभमुहूर्तावर सर्व मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होण्याच्या उद्देशाने बऱ्याच मंदिरांमध्ये ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे पंढरपूरच्या मंदिराचा देखील त्यात समावेश होता. मात्र, आता हा निर्णय पंढरपूरच्या प्रशासनाने मागे घेतला असून आता दर्शनाकरता ऑनलाईनची कोणतीही गरज नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

- Advertisement -

ओळख पत्राची आवश्यकता

ऑनलाईन बुकिंगची गरज नसली तरी देखील रहिवाशी पुरावा, आधार किंवा मतदान ओळखत्र असणे आवश्यक असणार आहे.


हेही वाचा – ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेले सोलापूरचे डिसले पहिले भारतीय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -