घरताज्या घडामोडीराज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा - मुनगंटीवार

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा – मुनगंटीवार

Subscribe

७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत म्हणजे स्वप्नांचे इमले रचण्याचाच प्रकार आहे

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी तुझेच पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका भाजपचे नेतेआणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. राज्य सरकारने काल पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. या मदतीवरून मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. (Sudhir mungantivar slam govt over aid for flood victims)  प्रत्यक्षात या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. ७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत म्हणजे स्वप्नांचे इमले रचण्याचाच प्रकार आहे , असा टोला मुनगंटीवार यांनी बुधवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात लगावला आहे. अर्थ पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १ हजार ५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली आहे. या मदतीतून पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या हाती फारसे काहीच लागणार नाही, असे म्हटले आहे.

३१ ऑगस्ट २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता. त्यातही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते आहे. आमच्या सरकारने पूर, अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती अशांना ९५ हजार १०० रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

- Advertisement -

आघाडी सरकारने संकटग्रस्तांना घरभाडे दिलेले नाही तसेच ज्यांची घरे पूर्णतः बाधीत झाली आहेत अशांनाही योग्य मदत दिली नाही. शेतकऱ्यांना आमच्या सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा कमी मदत आघाडी सरकारने दिली आहे.आमच्या सरकारने ५ ब्रास मुरूम आणि ५ ब्रास वाळूही मोफत दिली होती, असे मुनगंटीवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.

पूरग्रस्तांसाठी फक्त दीड हजार कोटींची मदत,फडणवीसांचा दावा

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांना दीड हजार कोटी रूपयांचीच तातडीची मदत मिळणार आहे, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. राज्य सरकारने काल, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत घोषित केली. फडणवीस यांनी या मदतीचे विश्लेषण करणारे ट्विट आज केले.

- Advertisement -

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १५०० कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. पुनर्बांधणीचे ३ हजार कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ७ हजार कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 


हेही वाचा – Maratha Reservation: राज्याला आरक्षणाच्या अधिकारापेक्षा, आरक्षण मर्यादेत वाढ गरजेची- अशोक चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -