Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र धमकी देणाऱ्यालाच मिळते पोलीस संरक्षण; संजय राऊतांचा थेट आरोप

धमकी देणाऱ्यालाच मिळते पोलीस संरक्षण; संजय राऊतांचा थेट आरोप

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा एकदा धमकी जीवे मारण्याची आल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांचे लहान भाऊ सुनील राऊत यांच्या फोनवर दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, धमकी देणाऱ्यानांच पोलीस सरंक्षण मिळत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला येणाऱ्या धमक्यांकडे सरकारने, गृहमंत्र्यांनी, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी, पोलीस यंत्रणेने पाहायला हवं पाहायला, आम्ही कसं काय त्याकडे पाहणार. मी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य आहे, शिवसेनाचा नेता आहे, सामनाचा संपादक आहे. माझी पूर्ण सुरक्षा सरकारने काढून घेतली, पण एका शब्दात याबाबत मी तक्रार केलेली नाही. धमक्या वारंवार येत आहेत. याबाबत चार वेळा मी गृहमंत्र्यांना कळवले असल्याची माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. (Only the threat gets police protection; Direct accusation of Sanjay Raut)

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापोठापाठ संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

धमकी देणाऱ्यांलाच मिळते पोलीस संरक्षण
संजय राऊत म्हणाले की, मधल्या काळामध्ये ज्या एका महान गुंडाचे फोटो मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवाबरोबर ठाण्यात झळकत आहेत. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्याचे पुरावे मी गृहमंत्र्यांना पाठवून दिले. पण त्यासंदर्भात कारवाई झाली नाही आणि त्या गुंडालाच पोलीस संरक्षण दिले. तो जो गुंड आहे ठाण्यातला ज्याने एका वरिष्ठ खासदाराला धमकी देणे किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्याचे कृत्य करतो त्यालाच ठाणे पोलीसांनी संरक्षण दिल्याची माझी माहिती आहे आणि आमच्याविषयी चौकशी करायचं राहिलं बाजूला, अशी खंत संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवली.

- Advertisement -

सकाळी सरकारविरुद्ध बोलण्याचे थांबवा नाहीतर
संजय राऊत म्हणाले की, काल मी संभाजीनगरला होता. कालपासून सातत्याने माझ्या फोनवर आधी धमक्या येत आहेत. मी फोन घ्यायचा बंद केलं तर सुनील राऊत यांच्या फोनवर त्याच व्यक्तीने धमक्या दिल्या. त्याचं म्हणणं आहे की, तुम्ही सकाळी सरकारविरुद्ध बोलण्याचे थांबवा नाहीतर गोळ्या घालणार. धमकी देणाऱ्या माणसाच्या बोलण्याचा सुर आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

सरकार हे सर्व घडवतं आहे
मला धमकी आल्यावर एक नागरिक म्हणून कळवायचं कर्तव्य मी केले आहे. मी पोलीस आयुक्तांना, देवेन भारती आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत कळवले आहे. नाही तर उद्या म्हणतील तुम्ही आम्हाला कळवलं नाही. आमच्यापर्यंत माहिती आली नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. यावेळी त्यांनी आमच्या जीवाचे काहीतरी बर-वाईट व्हावं यासाठी सरकार हे सर्व घडवतं आहे, असा आरोपही केला.

 

- Advertisment -