घरमहाराष्ट्रदुसऱ्यांसाठी खड्डे खणणारेच..., अनिल जयसिंघानीप्रकरणी भाजपाचा ठाकरेंवर निशाणा

दुसऱ्यांसाठी खड्डे खणणारेच…, अनिल जयसिंघानीप्रकरणी भाजपाचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

Anil Jaisinghani Case | भाजपा नेते मोहित कंबोज याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमनला अटक झाल्याचं ते म्हणाले.

Anil Jaisinghani Case | मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुजरातमध्ये ७२ तासांचं ऑपरेशन राबवल्यानंतर अनिल सिंघानियाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. यावरून भाजपा नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या फ्रंटमनला अटक झाल्याचं ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन बुकी अनिल जयसिंघांनीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. तुम्ही लवकरच उघडे पडणार आहात. जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यात पडतात, या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

- Advertisement -


अशी झाली अटक

गुन्हे शाखेने सहआयुक्त गुन्हे यांच्या नेतृत्त्वाखाली पाच पथके तयार केली होती. सायबर गुन्ह्यांची तीन पथके, सीआयूचे १ पथक आणि गुन्हे शाखा युनिट १० चे एका पथकाचा यात समावेश करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी हे पाचही पथक विविध राज्यात तपासासाठी पाठवण्यात आली होती. या तपासादरम्यान पोलिसांना सुगावा लागला. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिल जयसिंघानी महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बारदोली येथे पोहोचल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे तीन पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलीस, सुरत ग्रामीण पोलीस, गोध्रा, बरोच, बडोदरा पोलिसांशी समनव्य करून ऑपरेशन गुजरातमध्ये राबवले. हा आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. तो बारदोली येथे कसल्याची माहिती मिळाली म्हणून पोलीस तेथे पोहोचले. पण तो तेथून निसटला. आरोपी नंतर सुरतमध्ये गेला, तिथेही पोलिसांनी सापळा रचला, परंतु, तो तिथूनही पोलिसांच्या हातून निसटला. पोटदारा, भरोच, वडोदरा या मार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना ७२ तासांच्या थरारानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास नाकाबंदी करून गोध्राजवळील कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, असा थरार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -