घरताज्या घडामोडीठाकरे सरकारमध्ये महिलांना एक टक्क्याहून कमी स्थान; वाचा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी

ठाकरे सरकारमध्ये महिलांना एक टक्क्याहून कमी स्थान; वाचा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी

Subscribe

ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार विधीमंडळाच्या आवारात पार पडला. या विस्तारात तीनही पक्षांच्या ३६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तीनही पक्षांनी प्रादेशिक, जातीय आणि धार्मिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांना पुरेसे स्थान देण्यात आलेले नाही. काँग्रेसच्या केवळ दोन आणि राष्ट्रवादीतर्फे एका महिला आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची संख्या आता ४३ झाली असून यामध्ये फक्त तीन महिलांचा समावेश आहे.

काँग्रेसतर्फे मुंबईच्या वर्षा गायकवाड आणि तिवसा मतदारसंघातील यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील आदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. महा विकास आघाडीतील महिला आमदारांची पक्षनिहाय संख्या पाहिली असता शिवसेनेकडे ५६ आमदारांपैकी दोन महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांपैकी तीन महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. तर काँग्रेसच्या सर्वाधिक ४४ जागांपैकी पाच महिला आमदार निवडून आलेल्या आहेत.

- Advertisement -

आज शपथ घेतलेले ३६ मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री

उपमुख्यमंत्री
अजित पवार – बारामती मतदारसंघ

कॅबिनेट मंत्री

- Advertisement -

नवाब मलिक – अणुशक्ती मतदारसंघ
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव मतदारसंघ
हसन मुश्रीफ – कागल मतदारसंघ
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
अनिल देशमुख – काटोल मतदारसंघ
जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा मतदारसंघ
धनंजय मुंडे – परळी मतदारसंघ
राजेश टोपे – घनसावंगी मतदारसंघ
डॉ. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा मतदारसंघ

राज्यमंत्री

दत्तात्रय भरणे – इंदापूर मतदारसंघ
आदिती तटकरे – श्रीवर्धन मतदारसंघ
प्राजक्त तनपुरे – राहुरी मतदारसंघ
संजय बनसोडे – उदगीर मतदारसंघ

शिवसेना पक्षाचे मंत्री

कॅबिनेट

आदित्य ठाकरे – वरळी मतदारसंघ
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण मतदारसंघ
संजय राठोड – दिग्रस मतदारसंघ
दादा भुसे – मालेगाव बाह्य
अनिल परब – विधानपरिषद
उदय सामंत – रत्नागिरी मतदारसंघ
संदीपान घुमरे – पैठण मतदारसंघ
शंकरराव गडाख – क्रांतिकारी पक्ष – नेवासा मतदारसंघ

राज्यमंत्री

बच्चू कडू – प्रहार जनशक्ती – अचलपूर
अब्दुल सत्तार – सिल्लोड मतदारसंघ
शंभुराजे देसाई – पाटण मतदारसंघ
राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ मतदारसंघ

काँग्रेस पक्षाचे मंत्री

कॅबिनेट

अशोक चव्हाण – भोकर मतदारसंघ
के सी पडवी – अक्कलकुवा
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
अमित देशमुख – लातूर शहर
सुनिल केदार – सावनेर
यशोमती ठाकूर – तिवसा
वर्षा गायकवाड – धारावी
अस्लम शेख – मालाड पश्चिम

राज्यमंत्री

सतेज (बंटी) पाटील – कोल्हापूर (विधानपरिषद)
विश्वजीत कदम – पलुस कडेगाव

 


२८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामध्ये राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती. सर्व मंत्र्यांची एकूण संख्या आता ४३ होत आहे. यापैकी केवळ तीनच महिला आमदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -