यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नावाने टेक्नो एज्युकेशन या एका खाजगी संकेतस्थळाने (https://technoeducation.in/ycmou-b-ed-application-start/) २० जानेवारी पासून ‘सेवांतर्गत बी. एड.. प्रवेश’ सुरु असल्याची खोटी जाहिरात परस्पर ऑनलाईन प्रसिद्ध केलेली आहे. संबंधित जाहिरात ही पूर्णपणे चुकीची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक देखील होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित संकेतस्थळाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया देखील सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ किंवा https://www.ycmou.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळाचाच विद्यापीठ माहितीसाठी उपयोग करावा. अशा फसव्या शैक्षणिक जाहिराती व चुकीच्या माहितीपासून सावध रहावे असे आवाहन विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले आहे.
फसव्या शैक्षणिक जाहिरातीपासून सावध राहण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन
written By Sushant Kirve
Nashik