घरCORONA UPDATEOperation Samudra Setu : फ्रेंचहून २० मेट्रीक टन ऑक्सिजनसह INS त्रिकंड मुंबईत...

Operation Samudra Setu : फ्रेंचहून २० मेट्रीक टन ऑक्सिजनसह INS त्रिकंड मुंबईत दाखल

Subscribe

पुढील दोन महिन्यात भारताला फ्रेंच सरकारकडून आणखी ६०० मेट्रीक टनचा पुरवठा होणार

देशात कोरोनाची (covid 19) परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय नौसेनेने विदेशातून ऑक्सिजन कंटेनवर आणि सिलेंडर आणण्यासाठी एकत्र आले आहेत. ऑपरेशन समुद्र सेतूच्या (Operation Samudra Setu )माध्यामातून आज नौसेनेने युद्धपातळीवर लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर आणि कंटेनर्स त्याचबरोबर इतर वैद्यकीय उपकरणे भारतात आणली आहेत. करत,कुवैत आणि सिंगापूर येथून लिक्विड ऑक्सिजन आणि कंटेनर्स भारतात दाखल झाले आहेत. ऑपरेशन समुद्र सेतूचा भाग दोन असलेल्या भारतीय नौदलाचे ‘त्रिकंद’ हे जहाज कतार हमद बंदरावरुन लिक्विड मेडीकल ऑक्सिजन आणि कंटेनर्स घेऊन मुंबईच्या डॉकयार्डमध्ये दाखल झाले आहे. INS त्रिकंडचे मुंबईच्या डॉकयार्डमध्ये आगमन झाले आहे. २० मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन INS त्रिकंड मुंबईत पोहचली आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला फ्रेंच सरकारची मदत केली आहे.

भारताला मदत करण्यासाठी फ्रान्स ‘oxygen Slodarity Bridge’ उपक्रम राबवणार आहे. कतार ते भारत पर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. कतारमधील राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यात भारताला फ्रेंच सरकारकडून आणखी ६०० मेट्रीक टनचा पुरवठा होणार आहे. त्रिकंद हे जहाज ५ मे रोजी कतारमध्ये गेले त्यानंतर आता १० मे रोजी त्रिकंद मुंबईत दाखल झाले.

- Advertisement -

आंतराष्ट्रीय बाजारातून ही पहिला मालवाहतूक करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्याचबरोबर सोनिया बार्बरी, कॉसुल जनरल, फ्रेंच वाणिज्य द्रूतावास ही उपस्थित होते. आज सकाळी INS ऐरावत जहाज सिंगापूहून ८ ऑक्सिजन सिलेंडर आणि वैद्यकिय साहित्या घेऊन विशाखापट्टणमला दाखल झाले.


हेही वाचा – Vaccination: लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना सावध! नवी मुंबई पोलिसांनी दिल्या खास टिप्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -