घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023महाराष्ट्रातल्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

महाराष्ट्रातल्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | राज्य सरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची सरकारने अवहेलना केली असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. राज्य सरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची सरकारने अवहेलना केली असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

हेही वाचा – गोळीबार करायला ही काय मोगलाई आहे? कायदा-सुव्यवस्थेप्रश्नी अजित पवार आक्रमक

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी 286 पदकांची लयलूट केली आहे. तसेच या वर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकवली आहेत. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी खेळाडूंना कोणत्याही प्रकारची रोख रक्कम मिळालेली नाही तसेच त्यांचा गौरव सुध्दा करण्यात आलेला नाही. विजेत्या खेळाडूंना राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेली रोख रक्कम तातडीने देण्यात यावी तसेच त्यांचा उचित गौरव सुध्दा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – आयुक्तालय नाही फक्त आयुक्तांचीच दिल्लीवारी, फडणवीसांची सभागृहात माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -