घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता - अजित पवार

महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता – अजित पवार

Subscribe

मुंबई | महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्याता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वर्तवली आहे. महाविकास आघाडीची रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवसस्थानी रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Legislative Assembly) निवडणुकीसंदर्भाच चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी बैठकी पार पडली. यात कर्नाटकाच्या निकालानंतर विरोधकांमध्ये आनंद द्विगुणीत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात पुढची वाटचाल कशी असेल, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार बैठक बोलविली होती. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप, आणि कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे ठरवावे आणि त्याचबरोबर २८८ विधासभेच्या जागांची देखील चर्चा झाली. कारण, लोकसभेबरोबर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील अशा चर्चा आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका लागल्या धावपळ नको म्हणून महाविकास आघाडीने आधीच तयारी केलेली बरी, अशा पद्धतीने बैठकीत साधक बाधक चर्चा झाली,” अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

‘मविआ’च्या मित्र पक्षांना बरोबर घेणार

जागावाटपासाठी काही फॉर्मुला ठरवला आहे का?, किंवा यासाठी समिती स्थापना करण्याचा निर्णय बैठकीत झाला का?, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “जागासाठी प्रत्येक पक्षकडून नावे येतील, महाविकास आघाडीशी संबंधित असणारे जे मित्रपक्ष आहेत. त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे. त्यांना बरोबर घ्यावे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे.  असे यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी २ दोन नेते बसून ४८ जागा वाटप चर्चा होईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -