घरताज्या घडामोडी"लवकर, लवकरच...'', अजित पवारांनी विनोदी ॲक्शन करत शिंदे-फडणवीसांची उडवली खिल्ली

“लवकर, लवकरच…”, अजित पवारांनी विनोदी ॲक्शन करत शिंदे-फडणवीसांची उडवली खिल्ली

Subscribe

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन होऊन आता एक महिना उलटला तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन होऊन आता एक महिना उलटला तरी, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच दररोज पत्रकारांकडून मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाबाबत विचारले जाते. यावर लवकरच करण्यात येईल असे उत्तर दिले जाते. त्यावर आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनोदी टीका केली आहे. “प्रत्येक वेळी आमचा मीडिया मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारतो विस्तार कधी? तर लवकर, लवकर, लवकरच…”, अशी विनोदी ॲक्शन करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांवर टीका केली. (Opposition leader ajit pawar slams cm ekanath shinde and dcm devendra fadnavis)

“महिनाभर झाला अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. प्रत्येक वेळी मीडिया त्यांना विचारते की विस्तार कधी, विस्तर कधी एकनाथराव आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बोलतात “लवकरच, लवकरच… लवकरच होईल, अरे कधी होईल?”, अशी टीका अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना केली. पुण्यातील सोमवार पेठ येथे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळेस ते बोलत होते.

- Advertisement -

शिवाय, “महाराष्ट्रमध्ये चांद्यापासून ते बांधापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होते, वेगवेगळे संकटे येतात, वेगवेगळी घटना निर्माण होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता ऍडमिशन सुरू झाले आहे. त्याच्याबद्दल पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत पुढचे काही प्रश्न आहेत? ते कोण घेणार? आम्ही दोघे आहोत… आम्ही दोघे आहोत, असे म्हणतात. अरे पण दोघे पुरू शकतात का? याचे तरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. मला टीका करायची नाही. पण याचा मोठा फटका आपल्या महाराष्ट्र बसतोय”, असेही अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे शिंदे सरकारकडून याला काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दिल्लीतून ज्यावेळेस सिग्नल मिळेल, त्या वेळेस यांचा विस्तार होणार आहे. यांच्या हातात काही नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -