घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच : अजित पवार

मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच : अजित पवार

Subscribe

मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून आपल्याला निमंत्रण दिले. त्यामुळे आज मी उपस्थित राहणार आहे. एवढे काम केले. आणि तरी मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी नाराजी असते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच', असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

‘मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून आपल्याला निमंत्रण दिले. त्यामुळे आज मी उपस्थित राहणार आहे. एवढे काम केले. आणि तरी मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी नाराजी असते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच’, असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे. राज्यातील नव्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मागील 38 दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

“आज 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितलं, निमंत्रणही आले आहे. मी विरोधीपक्ष नेता या नात्याने मंत्रिमंडळ विस्तारासाठी हजर राहणार आहे. नाराजीबद्दल मला काहीच माहित नाही. कोणाचेही सरकार असते. मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तेव्हा अनेकांना वाटते आपण काम केले आहे, का संधी मिळत नाही?, ज्यांना संधी मिळते ते समाधानी आणि खूश असतात. ज्यांना ती मिळत नाही त्यांची नाराजी पाहायला मिळते. हे पूर्ण मंत्रिमंडळ नाही अशी ऐकीव बातमी आहे. त्यामुळे किती लोकांचे मंत्रिमंडळ आहे माहित नाही. जे राहिले आहेत, त्यांना तिसऱ्या टप्प्यात संधी देऊ असे सांगून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

“मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच. पण आजचा मंत्रिमंडळ विस्तार हा छोट्या स्वरुपाचा आहे. पुढे मोठ्या स्वरुपात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आमदारांची नाराजी दूर केली जाऊ शकते”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, आजच्या शपथविधी वेळी भाजपाकडून 9 आणि शिंदे गटाकडून 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून रात्रभर बैठक चालल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते.

- Advertisement -

हेही वाचा –  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंचं विधान परिषद सदस्यत्व कायम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -