9pm9Minutes: मोदींच्या आवाहनला विरोधकांनी यावेळी दाखवली पाठ

Narendra Modi diya light

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपापल्या घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्या लावण्याचे आवाहन केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद देखील पहायला मिळाला. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मात्र मोदींच्या या आवाहनाकडे पाठ फिरवली. मोदींच्या टाळी आणि थाळीला प्रतिसाद देणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसने मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहना फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. माझ्या देवघरातल्या विठूमाऊलींच्या समोर नित्यनियमनाने तेवत असणारा हा दिवा मला नेहमीच वारकरी संप्रदायाची शिकवण असणाऱ्या एकात्मता, समानता, सहिष्णुतेची प्रेरणा देत असतो. याच विचारांवर भूतकाळात आपला देश बांधला गेला, वर्तमानकाळात एक आहे व भविष्यातही असाच राहिल असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझ्या देवघरातल्या विठूमाऊलींच्या समोर नित्यानियमनाने तेवत असणारा हा दिवा मला नेहमीच वारकरी संप्रदायाची शिकवण असणाऱ्या…

Rohit Rajendra Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 5, 2020

 

उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंनी देखील फिरवली पाठ

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यु झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मातोश्री येथे टाळी वाजवून मोदींनी केलेल्या आवाहनाला साथ दिली होती. मात्र आजच्या मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र पाठ फिरवली आहे. तर खुद्द शरद पवार यांनी देखील मोदींच्या दिव्यांच्या सकल्पनेकडे पाठ फिरवली. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांनी थाळीच्या आवाहनाला साथ दिली होती. तर राज ठाकरेंच्या कुटुंबियांनी २२ मार्च रोजी थाळीनाद केला होता. मात्र यावेळी राज ठाकरे कुटुंबियांनी सहभाग नोंदविला नाही.

विरोधकांची मोदींच्या आवाहनवर टीका

दरम्यान दिवे लावण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केल्या नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता. लोकांना टाळ्या वाजवायला सांगून, दिवे किंवा मोबाइल टॉर्च लावण्याचं आवाहन करुन कोरोनाचं संकट कमी होणार नाही. त्यासाठी चाचण्या वाढवणं आवश्यक आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केली होती.