घरमहाराष्ट्रयुती केली नसती तर १५० जागा जिंकलो असतो

युती केली नसती तर १५० जागा जिंकलो असतो

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सज्जन व्यक्ती होते. मात्र, त्यांचे सरकारवर काहीही नियंत्रण नव्हते. त्यांच्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभा निवडणुकीत युती केली नसती तर १५० जागा जिंकलो असतो, असे फडणवीस यांनी सांगत शिवसेनेला टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपच्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. मोदीजी स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर मोदीजींनी स्वयंसेवक होऊन देशसेवा सुरू केली. नरेंद्र मोदींचं एकूण व्यक्तिमत्त्व पाहिलं तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक त्यांच्यात दिसते.स्वामी विवेकानंदांप्रमाणे योद्धा संन्यासी होऊन मोदीजी जीवन जगत आहेत.

- Advertisement -

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराची लढाई सुरू केली आणि ना खाऊंगा न खाने दुंगा हा मार्ग अवलंबला. नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान दिले आणि ती मोडीत काढली. व्यवस्था नुसती मोडीत नाही काढली तर नवी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. आता दिल्लीत मंत्रालयात कुणाची लाच मागण्याची हिंमत होत नाही. कोरोना काळात महाराष्ट्रात मंत्रालयात शुकशुकाट होता. मात्र, दिल्लीत मंत्रालय सुरू होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युती केली ही एकच गोष्ट चुकली
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या राजकीय भाकितांचा आधार घेत फडणवीस म्हणाले की, भाऊंनी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढला तर १५० जागा आणि युतीत लढला तर २०० जागा असे भाकीत वर्तवले होते. विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -