घरमहाराष्ट्रसंकट काळात जनतेचा आक्रोश समजून घ्या, अंगावर जाणं योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त...

संकट काळात जनतेचा आक्रोश समजून घ्या, अंगावर जाणं योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त केला संताप

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूण शहाराचा दौरा केला. यावेळी मदतीची विनवणी करणाऱ्यांवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव दमदाटी करताना दिसले. यावरुन मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. भास्कर जाधव यांचं हे वर्तन अतिशय धक्कादायक आहे, फडणवीस म्हणाले.

राज्यकर्त्यांनी लक्षात घेतंल पाहिजे अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळी जनतेमध्ये आक्रोश असतो. जनता काय तुमच्या विरोधात नसते. पण तो आक्रोश व्यक्त करायचा असतो. काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षेने लोकं बोलत असतात. अशावेळी त्यांना चूप करणं, त्यांच्या अंगावर जाणं हे काही योग्य नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा विचार केला पाहिजे. कालची जी घटना घडली ती धक्कादायक होती. भास्कर जाधव हे वरिष्ठ आमदार आहेत. ते मंत्री देखील राहिले आहेत. काल जे त्यांचं वर्तन होतं ते योग्य वाटलं नाही. मला असं वाटतं की ते स्वत: यासंदर्भात आत्मचिंतन करतील, असं फडणवीस म्हणाले. हा विषय पक्षांतर्गत आहे, पण मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असं देखील फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

काल काय घडलं?

मुसळधार पावसामुळे चिपळूण पाण्याखाली गेलं होतं. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री काल चिपळूणला होते. मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी एक महिला मुख्यमंत्र्यांकडे भरपाईची विनवणी करत होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी दमदाटी करत असल्याचं दिसून आलं.

चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान आणि गाऱ्हाणी ऐकत होते त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. “माझं घर गेलं…माझं दुकान गेलं…तुम्ही काहीतरी करा…,” असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा…तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा…तुम्ही काय पण करा पण मदत करा…” असं अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -