घरदेश-विदेशLive Update : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर, 11 उमेदवारांना संधी

Live Update : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर, 11 उमेदवारांना संधी

Subscribe

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर, 11 उमेदवारांना संधी

हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

31/3/2024 20:53:51


क्रिकेटपटू केदार जाधवने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

- Advertisement -

31/3/2024 20:30:13


बागेश्वर महाराजांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

बाबा जुमदेव महाराजांबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान

31/3/2024 19:0:17


संविधानविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचं आहे – शरद पवार

संविधानविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचं आहे – शरद पवार
केजरीवाल, सोरेन यांची अटक हा लोकशाहीवर हल्ला

31/3/2024 14:18:42


गोविंदाचा पुन्हा राजकारणात प्रवेश हे आश्चर्यकारक- राम नाईक

भाजपा नेते राम नाईक हे अभिनेता गोविंदा याच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहेत.

गोविंदाने 2004 साली निवडणूक लढवण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती. त्याने बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर याचीही मदत घेतल्याचा आरोप राम नाईक यांनी केला आहे.

31/3/2024 14:14:46


लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न प्रदान

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान


अंबादास दानवे आणि चंद्रकांत दानवेंच्या भेटीला

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवला

संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार


महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत, लोकसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं घोषित केलं आहे.


अंबादास दानवें शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेणार आहेत 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सकाळी 10.45 वाजता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगरातील रेल्वेस्थान जवळील निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहे.

31/3/2024 9:12:3


नवी दिल्लीत विरोधकांची आज रॅली

राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधात एकवटणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता ही रॅली होणार आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.

31/3/2024 8:4:37


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -