घरमहाराष्ट्रगैरसमज दूर होतील; कीर्तिकरांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचा खुलासा

गैरसमज दूर होतील; कीर्तिकरांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचा खुलासा

Subscribe

गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली. तर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी निधी वाटपावरुन काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करु अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजप आम्हाला सावत्रासारखी वागणूक देत असल्याचं म्हटलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली. तर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी निधी वाटपावरुन काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. ( Opposition parties criticized BJP after Gajanan Kirtikars statement Now Shinde group spokesperson and minister Deepak Kesarkar replied )

कीर्तिकर काय म्हणाले होते?

भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला सापत्नभावाची वागणूक मिळते आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे. त्यामुळे आमच्या शिवसेनेला त्याप्रमाणे दर्जा आणि वागणूक मिळाली पाहिजे. मात्र, तसं होतना दिसत नाही. भाजपसोबत केंद्रामध्ये शिवसेनेचे 13 खासदार सहभागी आहे.

- Advertisement -

गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले की, शिवसेना जर रालोआचा घटक असेल तर खासदारांची कामेही त्याच पद्धतीने झाली पाहिजेत. निवडणुकीमध्ये जागांचे वाटपही त्याच पद्धतीने व्हायला हवे. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 25 ते शिवसेना 23 जागा लढली होती. त्यापैकी आमचे 18 खासदार निवडून आले. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तसचं जागा वाटप व्हावं. आम्ही लढवलेल्या जागा आमच्याकडे राहाव्यात त्यांनी लढवलेल्या जागा त्यांच्याकडे राहाव्यात, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

राऊतांवर हक्कभंग आणा

शिवसेनेच्या घटनेमध्ये जो बदल केला गेला तो बेकायदेशीर असल्याचं निवडणूक आयोगानं ठरवलं आहे आणि जर ते केलेलं नसेल आणि त्याच्या अनुषंगाने जर काही निर्णय झालेले असतील तर तेही बेकायदेशीर ठरतील आणि म्हणूनच या सर्व गोष्टींची शहानिशा करण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. त्यांना त्यांचा अधिकार व्यवस्थित वापरु द्या. संजय राऊत त्याच्यावरही प्रतिक्रिया देत असतात. ते जे काही स्टेटमेंट करत असतात त्यामुळे त्यांच्यावर खर तर हककभंग आणला पाहिजे.

- Advertisement -

( हेही वाचा: Loksabha election : महायुतीत कुरबुर; शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्यानं भाजप नाराज? )

साधं विधानसभेच्या सदस्यावर जर जो त्याच काम पार पाडत असताना कोणी प्रतिक्रिया दिली तर त्यावर हक्कभंग होऊ शकतो. तर मग राऊत तर थेट अध्यक्षांवर बोलत आहेत. त्यांना धमक्या देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की राऊतांवर हक्कभंग आणला गेला पाहिजे. राऊत करत असलेलं स्टेटमेंट हे विधानसभेच्या हक्कांवर अतिक्रमण आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -