घरट्रेंडिंगदेवेंद्र फडणवीसंच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांची खलबत

देवेंद्र फडणवीसंच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांची खलबत

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर एक बैठक बोलावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Party Leader Devendra Fadnavis) यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर एक बैठक बोलावली आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. (Opposition Party Leader Devendra Fadnavis called Meeting with bjp Leaders at Sagar Bungalow)

सागर बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीला भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधिर मुनगंटीवार यांच्यासह अनेक भाजपाच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय चर्चा केली जाणार आणि सध्याच्या परिस्थितीबाबत काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपालांना रुग्णालयातून डिस्चार्ज, महाविकास आघाडी सरकारबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला (Delhi) जात आहेत. आजही फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. आज दुपारनंतर पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांची या आठवड्यातील ही चौथी दिल्ली वारी असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याच्या राजकारणात काय चाललंय याची कल्पना नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील आमदारांसह केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारला आहे. याआधीही बंड पुकारण्यात आला होता. मात्र त्यावेळी आमदारांची संख्या कमी होती. त्यावेळेचे बंड हे शिवसेने सत्तेत नसताना करण्यात आले होते. परंतु, आता शिवसेना सत्तेत असून मुख्यमंत्री स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्याने शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

याच बंडाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या बंडाला भाजपचीच फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -