आले, आले 50 खोके आले; विरोधी पक्षाचा शिंदे गटावर हल्लाबोल

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला दाखल झाले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला दाखल झाले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांनी 50 खोके आले अशा शब्दांत घोषणा देत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. (Opposition party leader slams cm eknath shinde group)

राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना म्हटले. तसेच, धनंजय मुंडे यांनी राज्यातील सत्ताधरी शिंदे गटाला गद्दार असे म्हटले. याशिवाय घोषणा घेत 50 खोके आले असल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्यासोबत सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकाराचा निषेध केला.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडळी पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेत  उभी फूट पडली. बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले. या सरकारक स्थापनेनंतर मागील महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री आणि नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकाराचा निषेध केला. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी तोडून भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे.


हेही वाचा – ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता