Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : विरोधी पक्षाने अर्वाच्च भाषेसाठी संजय राऊतांनाही पत्र द्यावे - फडणवीस

Devendra Fadnavis : विरोधी पक्षाने अर्वाच्च भाषेसाठी संजय राऊतांनाही पत्र द्यावे – फडणवीस

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापाण्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, प्रक्षोभक विधान करून आणि चिथावणीखोर भाषण करून राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात, असा आरोप केला आहे. याच आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे. (Opposition party should give letter to Sanjay Raut for Arwachcha language Devendra Fadnavis)

हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले की, विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आज मला कुठे पाहायला मिळाली नाही. पण त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा त्यांनी पत्रात कळवला आहे. नेमकं कशावर लक्ष केंद्रीत करावं, हे विरोधी पक्षांना लक्षात येत नाहीये. त्यामुळे त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच राज्यासमोरच्या प्रश्नांवर सरकार सातत्याने काम करत आहे. विकासाची कामं वेगाने चालू आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही येत आहे. मराठा समाजाच्या संदर्भात 10 टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Rohit Pawar : आमदार, राजकीय कुटुंब फोडण्यासाठी सागर बंगला; पवारांचा फडणवीसांवर थेट आरोप

विरोधकांनी पत्र आमच्यासाठी लिहिलं की संजय राऊतांसाठी

विरोधकांच्या पत्राचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांच्या पत्रात एक वाक्य मला मनोरंजक वाटलं. त्यात म्हटलं आहे की, सभांमध्ये अर्वाच्च भाषा, शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागलं आहे. आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलं आहे की, रोज सकाळी 9 वाजता जे पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यासाठी लिहिलं आहे? हा माझा पहिला प्रश्न आहे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच चिंता असेल, तर एक पत्र त्यांनाही द्या. ते कुठले कुठले शब्द वापरतात? काय काय बोलतात? सध्या विरोधी पक्ष निराशेतून जात आहेत, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.