मुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध; संजय पवार पोलिसांच्या ताब्यात

Opposition shivsena protest against Chief Minister Shindes Kolhapur visit Sanjay Pawar police custody

कोल्हापूर :  एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांना स्थान देण्यात आले. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत स्थापन केलेल्या या सरकारला उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून अद्यापही तीव्र विरोध होताना दिसतोय. दरम्यान कोल्हापूरचे दोन खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही खासदारांच्या शिंदे गटाच्या पाठींब्यामुळे कोल्हापूरात शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड पाहायला मिळत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरातील पूर परिस्थितीचा आढावा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 3.00 वाजता  कोल्हापूरात दाखल होणार आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा कोल्हापूरातील दाखल होण्याआधीच शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याला विरोध केला जाणार होता. तसेच मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याविरोधात निदर्शने केली जाणार होती.

तसेत यावेळी आज बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येणार होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने होणार होती. मात्र पोलिसांच्या एका पथकाने दुपारी 1 च्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी अडवत ताब्यात घेतले.

खेळात भारताची कामगिरी ऐतिहासिक, आता ऑलिम्पिकसाठी तयारी करा; मोदींचं खेळाडूंना आवाहन

मात्र मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा कोल्हापूरात दाखल होण्याआधीच संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवसैनिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव निदर्शने करून नये म्हणून कारवाई केल्याचे कोल्हापूर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे  कोल्हापूरात आंदोलक शिवसैनिकांची धरपडक सुरु आहे. संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेताच समर्थकांनी रस्त्यावर बसून पोलिसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना ताफा अडवणाऱ्या संजय पवार समर्थकांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईवर संजय पवार म्हणाले की, लोकशाही मार्गाने निदर्शने करणार होतो,लोकशाहीमध्ये आम्हाला तेवढा अधिकार नाही का असा सवाल करत राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. यात पवारांवरची कारवाई चुकीते असल्याचे म्हणत ही दहपशाही अल्याचेही शिवसैनिकांनी म्हटले आहे. यावेळी पवार यांनी स्वत: पोलिसांच्या कारमधून उतरून शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.


चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी