घरदेश-विदेशअंतिम वर्षासाठी ऑनलाईन,ओपन बुक टेस्टचा पर्याय

अंतिम वर्षासाठी ऑनलाईन,ओपन बुक टेस्टचा पर्याय

Subscribe

राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता सध्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर फिजिकली परीक्षा घेणे अवघड आहे. कारण कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. युजीसीने ऑनलाईन किंवा ओपन बुक टेस्ट घेऊ शकता, असे सुचवल्याचेही सामंत म्हणाले.

अंतिम वर्षांच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अनिवार्य आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परीक्षेसाठी नेमकी काय तयारी सुरू आहे, याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली

- Advertisement -

15 सप्टेंबरपर्यंत परीक्षाच घेऊ शकत नाही, असे गडचिरोली आणि चंद्रपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितले आहे. राज्यातील सध्याची कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता फिजिकली परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, अशीच पद्धत अवलंबवावी, असा आमचा प्रयत्न आहे. पण आमच्या बोलण्याचा विपर्यास कोणी करू नये. राजकारण होऊ नये. यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आज कुलगुरुंसोबत चर्चा करून त्यांच्या इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना सेंटरला बोलावून परीक्षा घेण्यासारखी सध्याची परिस्थिती नसल्याचे मत कुलगुरुंनी व्यक्त केले आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीसोबत दोन संचालक समन्वयाचे काम करतील. ही समिती रविवारी तातडीने कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. आम्ही सोमवारी (31 ऑगस्ट) दुपारी 12 वाजेपर्यंत याबाबत पहिला निर्णय जाहीर करू. 30 सप्टेंबरला परीक्षा घेणे शक्य आहे की नाही याबाबत माहिती देऊ, असे उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थी मानसिक दडपणाखाली आहेत. विद्यार्थ्यांना आरोग्याची अडचण होणार नाही, अशा सोप्या पद्धतीने परीक्षा घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणार आहोत. त्यामुळे संभ्रम नसावा. ऑनलाईन किंवा ओपन बुक टेस्ट घेऊ शकता, असे युजीसीने सुचवले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -