Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जितेंद्र आव्हाडांचे कौतुकोद्गार

सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जितेंद्र आव्हाडांचे कौतुकोद्गार

Subscribe

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जे गेले त्यांच्याबाबत मला सुख-दुःख काहीच नाही. पण सत्तेत असताना एकाही आमदाराला मदतीविना पाठवलं नाही. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं कौतुकोद्गार राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी काढले. तसेच, कोरोना काळात मी आजारी होतो. पण जेव्हा यातून बाहेर पडलो सगळ्यांना मदत केली. पक्षविरहित काम केलं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अभिनंदन प्रस्तावावर जितेंद्र आव्हाड बोलत होते. (Ordinary karyakarta gets justice, Jitendra Awhad praises Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा – शिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधात महाविकास आघाडीची ९९ मते

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जे गेले त्यांच्याबाबत मला सुख-दुःख काहीच नाही. पण सत्तेत असताना एकाही आमदाराला मदतीविना पाठवलं नाही.

मात्र, जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. माझ्या विभागातील लोकांच्या समस्या घेऊन गेलो होतो तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली नाही, असं सदा सरवणकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी गेले २० वर्षे पाहत आहे. त्यांची भाषण करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ही पद्धत आज दिसली नाही. आज त्यांची स्टाईल, आवेश, आक्रमकपणा दिसला नाही. त्यांचा आवाज दबला गेला असं वाटलं. जसा मी बदललो तसे तुम्ही बदललात असं दिसतंय.

एकनाथ शिंदेंविषयी बोलताना ते म्हणाले की, एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला. तुमच्या विरोधात तीस वर्षे आमदार म्हणून उभा राहिलो, पण कधीही मनात वैरभाव नव्हता. त्यामुळे यापुढेही सूड, आकस, ठेवणार नाही. तीच आपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघात मदत कराल अशी अपेक्षा आहे, असंही ते पुढे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -