घरमहाराष्ट्रअवयवदानाची प्रक्रिया होणार सोपी; झेडटीसीसीचं अॅप प्रायोगिक तत्वावर सुरू

अवयवदानाची प्रक्रिया होणार सोपी; झेडटीसीसीचं अॅप प्रायोगिक तत्वावर सुरू

Subscribe

दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग. अवयव प्रत्यारोपण समितीने प्रायोगिक तत्वावर सुरु केली वेबसाईट

सप्टेंबर महिन्यातील अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने महत्त्वाचे पाऊल उचलत या प्रक्रियेसाठी अॅप्लिकेशन तयार करुन प्रायोगिक तत्वावर हे अॅप सुरू करण्यात आलं आहे. अवयवदान ते अवयव प्रत्यारोपण हा प्रवास सहज आणि सुरक्षित होण्यासाठी झे़डटीसीसीने हे अॅप प्रायोगिक तत्वावर सुरु केले आहे. या अॅपमुळे अवयवदान करणाऱ्या दात्याच्या माहितीसह अवयव प्राप्त करणाऱ्याची ही माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अवयवदानादरम्यान होणाऱ्या अनेक त्रुटी टाळता येतील, अशी ग्वाही झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी दिली.

वेबसाईटवर मिळणार संपूर्ण माहिती

अवयवाची गरज असणाऱ्यांची नोंद अॅप आणि वेबसाईटमधून होणार आहे. यातून आठ ते दहा तासाचा लागणारा कालावधी निव्वळ दहा मिनिटांवर येणार आहे. तसेच एका वेळी ५० जणांच्या अवयवदानाची माहिती या अॅपमधून मिळू शकते, अशी माहिती डॉ. माथूर यांनी दिली.

- Advertisement -

अशी असणार प्रक्रिया 

या अॅपमध्ये ७ स्तरीय सुरक्षा असून झेडटीसीसी, हॉस्पिटल आणि अवयव प्राप्तकर्ता यांच्यातच या अॅपची हाताळणी राहणार आहे. यातून अवयवदाता आणि अवयव घेणाऱ्याची तंतोतंत माहिती नोंदवण्यात येणार आहे. प्रतिक्षा यादीतील क्रमांकामध्येही कोणी हस्तक्षेप करु शकणार नाही. या ठिकाणी अवयवदान होईल त्या हॉस्पिटलमधील समन्वयक हा अर्ज ऑनलाईन भरेल. त्याच वेळी झेडटीसीसीमधील समन्वयकाला ही सुचना अॅपव्दारे लगेचच मिळेल. यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण सुरक्षित राहणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. माथूर यांनी सांगितलं की, ‘झेडटीसीसीमधून किती अवयव प्रत्यारोपण करण्यात आले ? किती जण प्रतिक्षा यादीत आहेत ? यासारखी माहिती रोजच्या रोज तपासली जाते. तसेच, दर महिन्याला या माहितीचा रुग्णालय आणि समन्वयकांकडून अहवाल घेतला जातो’.

अॅप किंवा वेबसाईटची हाताळणी सुरक्षित असून अवयवदान प्रक्रियेतीलच डॉक्टर आणि समन्वयक याची हाताळणी करणार आहेत. त्यामुळे हे अॅप सुरक्षित आहे. दाता कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि अवयवाच्या प्रतिक्षा यादीत असणारा कोण आहे? याची माहिती अॅपमधून मिळेल. लवकरच अॅपचे प्रशिक्षण पूर्ण होईल.
-डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष झेडटीसीसी.

 

हेही वाचा – ‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ प्रविण तोगडिया यांचा इशारा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -