घरमहाराष्ट्रपुणेसांगलीत कृष्णा नदीत होड्यांच्या स्पर्धा, आयर्विन पुलाजवळ उलटली होडी

सांगलीत कृष्णा नदीत होड्यांच्या स्पर्धा, आयर्विन पुलाजवळ उलटली होडी

Subscribe

सांगलीत कृष्णा नदीत होड्यांच्या स्पर्धेदरम्यान एक बोट उलटल्याची घटना घडली. मात्र, या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बोटीत असणाऱ्या 6 जणांना पोहता येत असल्याने सर्व जण नदी काठावर सुखरुप पोहोचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

रविवारी सांगलीत कृष्णा नदीत होड्यांची स्पर्धा भरवल्या होत्या. स्पर्धा सुरु असताना आयर्विन पुलाखाली दोन होड्या अचानक समोरासमोर आल्या. यातील एक होडी. तिरकी करुन बाजूला घेण्याचा प्रयत्न होडीचालक करत होते. मात्र, पात्रात पाण्याचा वेग जास्त असल्याने होडीत पाणी शिरले आणि होडी उलटली. होडीमधील सहा तरुण नदीत पडले. परंतु ते सर्वजण पोहत काठावर आले. उलटलेली होडी पाण्याच्या प्रवाहात खाली वाहून जात होती. पण यावेळी दुसऱ्या होडी चालकांनी ही होडी ताब्यात घेतली.

- Advertisement -

शर्यती पाहण्यासाठी गर्दी –

सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कवठे पिरान, समडोळी अशा सांगली पंचक्रोशीतील गावच्या जवळपास दहा होड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वामी समर्थ घाटावरुन स्पर्धेला सुरुवात झाली. कृष्णेच्या पात्रातील वेगवान होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावर आणि आर्यर्विन पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या शर्यतीच्या वेळी आर्यर्विन पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात एक होडी पाण्यात उलटली. होडीतील सर्व तरुणांना पोहता येत असल्याने ते पोहत नदी काठी पोहोचले

- Advertisement -

50 वर्षांची परंपरा –

होड्यांच्या शर्यतीला 50 वर्षांपासूनची परंपरा लाभली आहे. सांगलीच्या कृष्ण नदीपात्रामध्ये होड्यांची शर्यत आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पावसाळ्यात पाणी ओसरल्यानंतर होड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. केवळ पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्येच कृष्णेच्या पात्रात अशा होड्याच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -