घरमहाराष्ट्रवरळीत ४ ते ६ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन, मुंबईत मराठी भाषिकांचा 'मराठा...

वरळीत ४ ते ६ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन, मुंबईत मराठी भाषिकांचा ‘मराठा तितुका मेळवावा’

Subscribe

मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

मुंबई : मराठी भाषा, मराठी संस्कृती, कला, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रातील मराठी माणसांना एकत्र आणणारा ’मराठा तितुका मेळवावा’ हा कार्यक्रम राज्य शासनाच्या भाषा विभागाने आयोजित केला आहे. मराठी माणसांना आणि सर्व मराठी संघटनांना एकत्र आणण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून, यापुढेही भव्यदिव्य असा कार्यक्रम करण्याचा निर्धार मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती दीपक केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मराठी माणसांची एकजूट करणारा आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, ४७० परराज्यांतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यांतील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

’मराठी तितुका मेळवावा’ या कार्यक्रमाला देशातील आणि देशाबाहेरील, असे ४५ ते ५० उद्योजकांची उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व उद्योजक एकत्र येणार असून, त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून ते राज्यात स्वत: गुंतवणूक करतील किंवा ते राज्यात गुंतवणूक आणू शकतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. या उद्योजकांसमवेत ६ जानेवारीला सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा देखील या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरीक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरीक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.


हेही वाचाः औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय…; चित्रा वाघ जितेंद्र आव्हाडांवर संतापल्या

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -