घरमहाराष्ट्रनाशिकविकासकामांच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांचाच विसर

विकासकामांच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांचाच विसर

Subscribe

देवळाली कॅम्प येथील प्रकारामुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात संयोजकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच विसर पडल्याची बाब शुक्रवारी (दि.१) पुढे आली.

देवळाली कॅम्प येथील विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्यानं महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमस्थळी लावलेल्या होर्डिंग्ज आणि व्यासपीठावरील फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. महाविकास आघाडी सरकार असल्यानं घटक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचाच फोटो नसल्याची चर्चा सुरू होती.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -