घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023...अन्यथा राज्याचे वाटोळे होईल, कॉपी आणि पेपर फुटीप्रकरणी अजित पवार संतापले

…अन्यथा राज्याचे वाटोळे होईल, कॉपी आणि पेपर फुटीप्रकरणी अजित पवार संतापले

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटाळे होईल असा घणाघात करत सरकारने गांभीर्याने घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटाळे होईल असा घणाघात करत सरकारने गांभीर्याने घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बुधवार, 15 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टाकळी-मानुरी (ता. पाथर्डी) येथे दहावीचा भूमितीचा पेपर सुरू होता. त्यावेळी परीक्षार्थींना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात बळजबरी प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. दगडफेक केली. पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परीषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्याच केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा ‘हाच’ तो प्रकार, फडणवीसांनी केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दहावी-बारावीच्या परिक्षेच्यावेळी सामूहिक कॉपी, पेपरफुटी सारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. तरी या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -