घरमहाराष्ट्र"आमचे मंत्री एवढे वाकले होते की...", छगन भुजबळांचा घरचा आहेर

“आमचे मंत्री एवढे वाकले होते की…”, छगन भुजबळांचा घरचा आहेर

Subscribe

जालना : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्याना कुणबीमधून आरक्षण देण्यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री त्यांना उपोषण मागे घेण्याची मागमी करत होते. सरकारमधील मंत्री मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यासाठी ऐवढे वाकले होते की, त्यांच्या कंबरेला शेख द्यावा, असा टोला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमधील मंत्र्यांना लावगाल. तसेच बीडमध्ये राजकीय नेत्यांच्या घरी जाळपोळ करण्यासाठी आंदोलकांनी कोडवर्ड दिले होते. यानुसार आमदार प्रकाश सोळुंके, संदीप श्रीसागर , जयदत्त श्रीसागर यांच्या घरे पेटवून दिली, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, “आमचे मंत्री सुद्धा निश्चितपणे मनोज जरांगे पाटीलने उपोषण मागे घ्यावे म्हणून त्यांच्यासमोर ऐवढे वाकले की, त्यांच्या कंबरेला शेक द्यावा लागला असेल. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करत होते की, उठा उठा. तुम्ही (मंत्री) गेले आणि न्यायामुर्तींना देखील नेहले. न्यायामुर्ती त्यांना (मनोज जरांगे पाटील) यांना सर सर म्हणत होते. हा पाचवी शिकला की नाही हे माहिती नाही. न्यायामूर्ती त्यांना सर सर म्हणतात काय रे…तू ( मनोज जरांगे पाटील) माझ्याबद्दल खूप बोललास याद राख माज्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस”, असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवले; भुजबळांचा ओबीसी मेळाव्यात खळबळजनक दावा

बीडच्या जाळपोळीच्या घटनांना कोड नंबर

बीडच्या जाळपोळींच्या घटनांवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “आमदार प्रकाश सांळुखे यांनी आरक्षणासंदर्भात म्हटले, आरक्षणामुळे दोन-तीन टक्के लोकांचा फायदा होतो, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आंदोलकांनी प्रकाश सांळुखेंच्या घरी गेले त्यांच्या पहिला दरवाजा तोडला आणि ऑफिस, गाड्या जाळल्या. सर्व ठिकाणी पेट्रोल बॉम्ब, कोयता, चॉपर सर्व गोष्टी तयार. 200-400 लोक गेले, प्रकाश सोळुंकेचे घर जाळले, असेही छगन भुजबळ म्हणाले. ” छगन भुजबळ पुढे म्हणाले, “बीडमध्ये ज्या जाळपोळीच्या घटना झाल्या, तिथे सगळीकडे पेट्रोल बॉम्ब होते. हा एक ग्रुप नव्हता, तर अनेक ग्रुप होते. या ग्रुपमध्ये लोकांना कोड नंबर देण्यात आले होते. 1 नंबर प्रकाश सोळुके 10 नंबर सुभाष राऊतचे हॉटेल, 21 नंबर जयदत्त श्रीसागर, 25 अमरसिंग पंडित”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुमच्या डोळ्यादेखत OBC आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर…; भुजबळांचा भाजपला थेट इशारा

श्रीसागरच्या कुटुंबियांना मुस्लिम बांधवांनी

“आंदोलकांनी बीडमध्ये संदीप श्रीसागर यांच्या कार्यालय आणि त्याच्या बाजूला जयदत्त श्रीसागर यांचे शिक्षण संस्थेचे कार्यालय पेटून दिली. यानंतर जयदत्त श्रीसागरच्या घरावर गेले, तिथे संदीप श्रीसागर, योगेश श्रीसागर हे एकाच घरात राहतात. श्रीसागर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेटले. यानंतर गाड्या पेटल्याने धुराचे लोट सुरू झाले. जीव वाचवण्यासाठी महिला-लेकरांसह खूर्च्यांवर उभ्या राहिल्या. मुस्लिम बांधवांनी महिला-लेकरांना वाचवले”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -