आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?, राज ठाकरेंचा टोला

संभाजीनगरचे नामांतर झाले मी बोलतोय ना, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेदरम्यान म्हणाले होते. याचा राज ठाकरेंनी तू कोण आहे? असे बोलून समाचार घेतला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु झालेल्या राजकारणावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.. संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय? मी बोलतोय ना..

Bala Nandgaonkar said Raj Thackeray undergo surgery on Wednesday
राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया कधी होणार? बाळा नांदगावकर म्हणाले उद्या...

मुंबईः त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आमचं खरं हिंदुत्व आणि त्यांचं खोटं हिंदुत्व, खरं हिंदुत्व काय आहे, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. त्याचे रिझल्ट पाहिजेत, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो, असंही राज ठाकरेंनी सांगितलंय. पुण्यातील गणेश कला क्रीडामध्ये राज ठाकरेंची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

संभाजीनगरचे नामांतर झाले मी बोलतोय ना, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेदरम्यान म्हणाले होते. याचा राज ठाकरेंनी तू कोण आहे? असे बोलून समाचार घेतला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु झालेल्या राजकारणावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.. संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय? मी बोलतोय ना.. आरे पण तू कोण आहे? तु कोण सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे. केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, कारण तो प्रश्न सतत जिवंत ठेवून त्यावरुन मत मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त करायच्या आहेत. संभाजीनगरचे नाव झाले तर प्रश्न मिटेल बोलायचे कसं? दहा दहा दिवस पाणी येत नाही. संभाजीनगर जालना अनेक विभागात पाणी नाही. ते विषय नाही. मी मागच्या ठाण्याच्या सभेत म्हणालो होतो या देशात मोदींनी लवकर समान नागरिक कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा आणावा, तसेच मोदींना विनंती आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करुन यांचे राजकारण मोडीत काढा, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

शरद पवारांना औरंगजेब सूफी संत वाटतो

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. शरद पवरांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलत आहात. यांचे हे जे सगळ राजकारण तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी हे राजकारण करणार, कोणी कोणाला भेटतय काय चाललंय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि राऊत जेवताना दिसले

मी सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. राणा दाम्पत्य उठलं आणि त्यांनी हनुमान चालिसा मातोश्रीवर म्हणण्याचा हट्ट केला. अरे मातोश्री काय मशिद आहे का? त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे, त्यानंतर एकत्रं आले. मग त्यांना सोडण्यात आलं. सेनेकडून वाटेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काही वाटतच नाही.


हेही वाचा: अरे पण तू कोण आहे? वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं