घरताज्या घडामोडीMaharashtra Rain: वेळीच मदत मिळाली असती तर आमची माणसं जिवंत असती, तळीये...

Maharashtra Rain: वेळीच मदत मिळाली असती तर आमची माणसं जिवंत असती, तळीये ग्रामस्थांचा आक्रोश

Subscribe

आमच्या माणसांना भेटण्यासाठी आमचा जीव तुटतोय मात्र अद्याप आम्हाला आमच्या माणसांना भेटू दिलेले नाही. काय सुरु आहे काहीच कळायला मार्ग नाही

महाडच्या तळीये गावावर दरड कोसळून आतापर्यंत ३८ जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. तर अद्याप ४४ लोक बेपत्ता आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम RDRF चे जवानांकडून सुरू आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण तळीये गाव भुईसपाट झाले आहे. संपूर्ण तळीये तसेच महाडवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांच्या जाण्याने आक्रोश करत आहेत. दरड कोसळल्यानंतर वेळेत बचावकार्य सुरु झाले असते, प्रशासन यंत्रणा वेळेत हजर झाल्या असत्या तर आमची माणसे आज आम्हाला जिवंत सापडली असती अशा आक्रोश तळीये ग्रामस्थ करत आहेत.

या दुर्देवी दुर्घटनेत अनेकांची कुटुंब उद्धवस्त झालीत, अनेकांचे संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून बेचिराख झालीत. तळीये येथे झालेल्या या भीषण दुर्घटेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. तळीये केवनाळे येथील ६ जणांचा मृत्यू झालाय. तर सुतारवाडी येथे ५ जणांचा दुर्देवी अंत झालाय. अनेकांचे आई,वडिल, भाऊ, बहिण या दुर्घटनेत मृत्यूमुखू पडले आहेत.

- Advertisement -

तळीये येथील दरड दुर्घटनेनंतर तिथल्या नागरिकांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपला माणूस मातीच्या ढिगाऱ्यात सापडले अशी भाबडी आशा ठेवून अनेकजण आपल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत. अनेक महिला, तसेच लहान मुलांनी आपली माणसे गमावल्याने हंबरडा फोडलाय. तळीये गावतील अनेक वाड्या या दरडीत बेचिकाख झाल्यात. तिथल्या ग्रामस्थांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणार आहे.

आमच्या माणसांना पहायलाही मिळाले नाही

आमच्या अनेक नातेवाईकांचा या दरड दुर्घटनेत मृत्यू झालाय. दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झालाय? किती माणसे सुखरुप आहेत? याची कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही.  आमच्या माणसांना भेटण्यासाठी आमचा जीव तुटतोय मात्र अद्याप आम्हाला आमच्या माणसांना भेटू दिलेले नाही. काय सुरु आहे काहीच कळायला मार्ग नाही,अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिलीय. अनेक नातेवाईक दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईहून महाडकडे रवाना झालेत. मात्र अद्याप त्यांना त्यांच्या माणसांची माहिती मिळालेली नाही. तळेयी येथील परिस्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Satara Landslide: सातारा आंबेघर गावात ४ घरांवर दरड, १२ जणांचा मृत्यू

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -