Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Kannad Ghat: कन्नड घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

Kannad Ghat: कन्नड घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेट कन्नडच्या घाटात सतत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 11 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून हा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेट कन्नडच्या घाटात सतत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 11 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून हा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांना जोडणारा कन्नड घाट हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होत होती. यामुळे या मार्गाने जाणारे नागरिक हे त्रस्त झाले होते. यामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी टाळण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट हा 11 ऑगस्टपासून अवजड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांच्या टेबलने हा निर्णय दिला आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्गही खंडपीठानं सुचवला असून यामुळे इथली वाहतूक कोंडी ही सुटणार असल्यानं नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ( Outram Ghat connecting Aurangabad Jalgaon district has been closed August 11 Kannada Ghat )

‘हे ‘आहेत पर्यायी मार्ग

  • पूर्वीचा मार्ग-औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतूक
  • पर्यायी मार्ग– औरंगाबाद ते दौलताबाद टी पॉइट- कसारखेडा-शिऊर बंगला-तलवाडा-नांदगाव मार्गे चाळीसगाव
- Advertisement -

 

  • पूर्वीचा मार्ग– चाळीसगाव-कन्नड औरंगाबादकडे-येणारी जड वाहतूक
  • पर्यायी मार्ग– चाळीसगाव-नांदगाव तलवाडा-शिऊर बंगला-कसावखेडा-दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद

 

  • पूर्वीचा मार्ग– जळगाव सिल्लोड फुलंबी-खुलताबाद मार्गे कन्नडकडे जाणारी वाहतूक
  • पर्यायी मार्ग– जळगाव सिल्लोड फुलंबी-खुलताबाद मार्गे कन्नडकडे जाणारी वाहतूक
- Advertisement -

( हेही वाचा: “अजित पवार- शरद पवारांकडे किती आमदार हेच कळत नाही”, मनसेच्या आमदाराचा टोला )

अ‌ॅड ज्ञानेश्वर बागूल, अ‌ॅड. निलेश देसले आणि अॅड श्रीकृष्ण चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी हा निर्णय कोर्टाने दिला. या निर्णयामुळे आता औट्राम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहनं, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहनं येथून प्रवास करू शकणार आहे.

- Advertisment -