नाशिक : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावर बोलतांना सांगितले की, माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी उपोषण सोडावे त्यांनी पाणी सोडले आहे त्यामुळे प्रकृती खराब होत आहे. त्यांचे शिस्टमंडळ आले होते त्यात चर्चा झाली होती. त्यात त्यांना तात्काळ जीआर हवा होता परंतु तात्काळ जीआर काढला तर न्यायालयात ते टिकणार नाही. त्यामुळे सध्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. (Minister Girish Mahajan clearly says Manoj jarange Patil wants Immediate GR was wanted but if immediate GR is issued it will not hold in court)
नाशिक येथे माध्यमांशी बोलतांना महाजन म्हणाले, सरसकट आरक्षण दिल्यास तांत्रिक दृष्ट्या टिकणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल त्याला काही कालावधी जाईल परंतु मनोज जरांगे पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे उपोषण सोडणारच नाही, उगाच त्यांच्या जीवाला धोका होईल कायम स्वरूपी मार्ग काढण्यासाठी शासनाला त्यांनी वेळ द्यावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. सुरुवातीला त्यांची मागणी वेगळी होती. मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे असे त्यांनी सांगितले होते परंतु कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे.
मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला आहे. आता ते मागणी करताय की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा परंतु हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखला देणे हे अश्यक्य आहे, म्हणून कायद्यानुसार मराठा आरक्षण हे घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिले तर ते कोर्टात टिकणार नाही.पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल त्यासाठी वेळ दिला पाहिजे.