भगवा झेंडा हाच आपला उमेदवार; न्यायालयाच्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरेंचा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद

मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी दिली.

मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी दिली. त्यानंतर दादरच्या शिवसेनाभवनासह आसपासच्या परिसारात जल्लोष सादरा करण्यात आला. मात्र, जेव्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती, त्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना “आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर गर्दी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधत “महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयरीला लागा”, असे म्हटले.

शिवसेनेचे वकील, सदा सरवणकरांचे (शिंदे गट) वकील, महापालिका वकिल यांचा शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने युक्तीवाद ऐकून सदा सरवणकर याच्या वकिलांची हस्तक्षेप याचिका फेटाळली. त्यानंतर पालिकेलाही खडेबोल सुनावले. अखेर गेली अनेक वर्षे शिवाजी पार्कात होणारा दसरा मेळावा आणि नियमांची पार्श्वभूमी लक्षात घेत उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याला परवानगी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, हायकोर्टाने शिंदे गटाला धक्का दिला असून सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली.


हेही वाचा – शिवाजी पार्कात ठाकरेंच्याच शिवसेनेचा ‘आवाज’; दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टाची मंजुरी