मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. सध्या गणेशोत्सव सुरू असून, सर्वत्र पक्षाचे बॅनर लावले जात आहे. मात्र या बॅनर लावण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. सध्या गणेशोत्सव सुरू असून, सर्वत्र पक्षाचे बॅनर लावले जात आहे. मात्र या बॅनर लावण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. प्रकाश देवी असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांच्या मेडीकलसमोर मनसेचे कार्यकर्ते खांब उभे करून बॅनर लावत होते. तेव्हा महिलेने या बॅनर लावण्याला विरोध केला असता, तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (over putting up Ganpati banner woman beaten up by MNS workers in Mumba Devi)

नेमकी घटना काय?

मुंबादेवी परिसरात प्रकाश देवी यांचे मेडिकल आहे. या मेडिकलसमोर मनसेचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब रोवत होते. हे खोदकामा मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि त्यांचे साथीदार बल्ली रोवत होते. मात्र, त्यावेळी मेडिकलसमोर होत असलेले खोदकामा करण्याला प्रकाश देवी यांनी विरोध केला. त्यानंतर मनसेच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध करत असल्यामुळे त्या वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली. तसेच, तिला धक्काबुक्की केली.

मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीत ही महिला दोन वेळा खाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला मारत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. महिलेने चापट मारण्याचे कारण विचारले असता, अरगिळे यांनी महिलेला धक्का दिला. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. पण दोघांमधील वाद पुन्हा वाढला. त्यामुळे आता मनसे या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार हे, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबादेवीतील या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. या घटनेवर उलटसूलट प्रतिक्रिया उमटत आहे. लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. मनसे कार्यकर्त्याच्या दादागिरीवरही लोकांनी आक्षेप घेतला आहे.


हेही वाचा – गणपती चालले गावाला! दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात