ओवेसींनी महाराष्ट्रातील देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला

औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडण करून तुम्ही महाराष्ट्र आणि देशातील तमाम देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला आहे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर सडकून टीका केली.

devendra fadnavis demand gave tukaram supe case to cbi for interrogation

औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडण करून तुम्ही महाराष्ट्र आणि देशातील तमाम देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला आहे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर सडकून टीका केली. औरंगाबाद दौर्‍यावर असताना अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाणदेखील उपस्थित होते. यावरून राज्यातील नेते ओवेसींवर आगपाखड करीत असतानाच ठाकरे सरकारकडे त्यांच्या अटकेची मागणीही केली जात आहे.

यासंदर्भात नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेब या देशात हिंदूंचा तर नाहीच पण मुस्लिमांचाही नेता होऊ शकत नाही. कारण या देशावर त्याने आक्रमण केले हेते. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांची हत्या केली, अशा औरंगजेबाचे महिमामंडण आम्ही मान्य करणार नाही.

काश्मीर तोडण्याचा नारा देणार्‍यांवर कारवाई नाही. शर्जीलवर कारवाई नाही, पण हनुमान चालीसा म्हटल्यावर कारवाई, लीलावतीतील एखादा फोटो ट्विट झाल्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत? त्यांनी औरंगजेबाचे महिमामंडण करणार्‍यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही हे सहन करणार नाही. त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.