घरमहाराष्ट्रभाजपा मला 'गाय' देईल का? ओवेसींचा सवाल

भाजपा मला ‘गाय’ देईल का? ओवेसींचा सवाल

Subscribe

मला गाय देण्याचं धाडसं भाजपमध्ये आहे का? असा सवाल करत ओवेसींनी भाजपवर निशाणा साधला. 

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे त्यांच्या भडकाऊ आणि वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच ओवेसी यांनी गोमाता अर्थात गायीबद्दल एक वक्तव्य केलं असून, त्यामुळे ते पुन्हा एकाद चर्चेत आले अाहेत. भाजपाने तेलंगण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून १ लाख गायी दान करण्याचा संकल्प सोडला आहे. याच मुद्द्याला धरुन ‘भाजपा  मला गाय दान करेल का?’ असा सवाल ओवेसींनी केला आहे. ‘भाजपाने मला गाय दान केली तर मी तिचा आदरपूर्वक सांभाळ करेन पण भाजप मला गाय देईल का हा प्रश्न आहे’, असं वक्तव्य ओवेसींनी केलं आहे. यासोबतच हा विषय हसण्यावारी नेण्याचा विषय नाही त्यामुळे याबद्दल भाजपने विचार करावा, असंही ओवेसींनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘भाजपाला काँग्रेसमुक्त भारत नाही तर मुस्लिममुक्त भारत करायचा आहे’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता ओवेसींच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकाद राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.


- Advertisement -

भाजप सरकार शहरांची आणि गावांची नावं बदलत सुटले आहे. मग ते अमित शहाचं पारशी आडनावही बदलणार आहेत का? असा सवाल यावेळी ओवेसी यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे गायींच्या मुद्द्यावरुनही ओवेसी यांनी भाजपवर टीका केली. १ लाख गायी दान करणाऱ्यांची मला गाय द्यायची तयारी आहे का? मी त्या गायीचा आदरपूर्वक सांभाळ करेन पण मला गाय देण्याचं धाडसं भाजपमध्ये आहे का? असा सवाल करत त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.


जरा जपून: पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांना खास ‘पुणेरी’ शिक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -