घरताज्या घडामोडीसफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Subscribe

मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. तसेच, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे.

मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. तसेच, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्णय घेतले. (Own house for cleaning staff 25 thousand rent for citizens of Patra chawl Declaration of the DCM in the Legislative Assembly)

“मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. 2 वर्षांपूर्वी कुणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला माहिती नाही. पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे” अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना 25 हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगार घराची लॉटरी तात्काळ काढण्यात येणार आहे. 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगारांना देखील लवकरच घर देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले आहे. पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.

- Advertisement -

50 किंवा 25 लाख पोलिस बांधवांना परवडणार नाही त्यामुळे त्यापेक्षा कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीडीडी चाळीतील नागरिकांना 500 चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी 29 ऑगस्ट रोजी (सोमवारी) पगार /निवृत्ती वेतन मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार पुढील महिन्यात एक सप्टेंबर रोजी होतो, हा पगार आता ऑगस्ट महिन्यातच 29 तारखेला होणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई वित्तीय नियम, 1959 मधील नियम 71 च्या तरतुदी तसेच कोषगार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी शिथिल केल्या आहेत.


हेही वाचा – सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग : बाळासाहेब थोरात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -