घरCORONA UPDATEमहाराष्ट्रातील कोरोना रूग्णांसाठी 'ऑक्सिजन एक्सप्रेस' विशाखापट्टणमला रवाना

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांसाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

Subscribe

ऑक्सिजन एक्सप्रेस मधून 10 ट्रक जाणार असून वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे हे ट्रक रवाना झाले.

ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झाली. रो-रो सेवा माध्यमातून ७ रिक्त टँकर असलेली मालगाडी आज कळंबोली माल यार्डमधून विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली. कोविड-१९ विरोधातील लढ्याला सामोरे जाताना रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची तयारी केली आहे .टीम मुंबई विभागाने फ्लॅट वॅगन्समध्ये/मधून टँकर लोड/अनलोड करणे सुलभ होण्यासाठी कळंबोली माल यार्ड येथे २४ तासांच्या आत रात्रभरात रॅम्प तयार केला. रो-रो सेवा ७ रिक्त टँकरसह असलेली मालगाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जं मार्गे ईस्ट-कोस्ट रेल्वे झोनमधील विशाखापट्टणम स्टील प्लांट साइडिंगकडे जाईल जिथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असेल. ही गाडी सोमवारी रात्री ८.०५ वाजता कळंबोली यार्ड मधून रवाना झाली. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे.

राज्यात ऑक्सिजन चा तुटवडा पडत असल्याने परराज्यातून ऑक्सिजन पाठवावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या विनंतीला केंद्र सरकार ने सकारात्मक प्रतिसाद दिला. आज कळंबोली आणि बोईसर येथून ऑक्सिजन एक्सप्रेस धावली. या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून 10 ट्रक जाणार असून वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे हे ट्रक रवाना झाले. ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी विशेष ट्रॅक ची निर्मिती करण्यात आली.

- Advertisement -

कळंबोली रेल्वे स्थानकावर सलग ४८ तास काम सुरू ठेवून प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात आली. १६ टन क्षमतेचे १५ टँकर्स विशेष ट्रेनवर चढवण्यात आले. टँकर्समध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरून माघारी परतणाऱ्या विशेष एक्स्प्रेस सुपरफास्ट वेगाने चालवण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था केली गेली आहे.


हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -