घरCORONA UPDATECorona Update : ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे महाराष्ट्रासह अन्य राज्यांना ३४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा...

Corona Update : ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे महाराष्ट्रासह अन्य राज्यांना ३४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

Subscribe

आतापर्यंत तब्बल ५४ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर बराच ताण आला आहे. अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून भारतीय रेल्वेने ज्या राज्यांमध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आहेत, तेथून इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु केली. आतापर्यंत तब्बल ५४ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात आल्या असून २२० टँकर्सच्या या माध्यमातून सर्व राज्यांना मिळून जवळपास ३४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली आहे.

चौथी ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या दिशेने

ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्राला २३० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. तसेच चौथी ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या, तर तिसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशला ९६८ मेट्रिक टन, मध्य प्रदेशला २४९ मेट्रिक टन, हरयाणाला ३५५ मेट्रिक टन, तेलंगणाला १२३ मेट्रिक टन, राजस्थानला ४० मेट्रिक टन आणि दिल्लीला १४२७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून करण्यात आला आहे.

- Advertisement -

कमीतकमी वेळात पुरवठा करण्याचे लक्ष्य 

सध्या ४१७ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन असलेले २६ टँकर्स घेऊन ऑक्सिजन एक्प्रेस महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि दिल्ली येथे लवकरच दाखल होणार आहेत. तसेच आज रात्री आणखी ऑक्सिजन एक्प्रेस आपला प्रवास सुरु करणे अपेक्षित आहे. जास्तीजास्त राज्यांना कमीतकमी वेळात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे भारतीय रेल्वेचे लक्ष्य असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -