Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Oxygen Shortage: ऑक्सिजन एक्सप्रेस गोंदियात दाखल, महाराष्ट्राला मोठा दिलासा

Oxygen Shortage: ऑक्सिजन एक्सप्रेस गोंदियात दाखल, महाराष्ट्राला मोठा दिलासा

राज्यात दाखल झालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसवर एकूण ऑक्सिजनचे ६० टॅंकर ठेवण्यात आले आहेत.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या मदतीने रेल्वेद्वारे इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्रातील मुंबई, कळंबोली येथून ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला रवाना झाली होती. विशाखा पट्टनमला वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन टँकरमध्ये भरल्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली होती. आता ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाली आहे. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ऑक्सिजन एक्सप्रेस गोंदिया जंक्शनमध्ये दाखल झाली यानंतर ८.१५ वाजता नागपूरमध्ये दाखल झाली आहे.

राज्यात दाखल झालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसवर एकूण ऑक्सिजनचे ६० टॅंकर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन रेल्वेला जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्याचा निर्णय घेतला होता. दूरवरुन ऑक्सिजन लवकर आणता यावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे रेल्वेने ऑक्सिजन आणण्यात यावा अशी मागणी केली होती. यानंतर हे ऑक्सिजन टॅंकर रेल्वेवर ठेवून विशाखापट्टनम,जमशेदपूर, राऊरकेला,बोकारो येथे पाठविण्यात आले होते. ऑक्सिजन एक्सप्रेस राज्या दाखल झाल्याने काही दिवसांपुरताचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटला असला तरी पुन्हा ऑक्सिजनची कमी भासणार आहे.

ऑक्सिज एक्सप्रेस सोमवारी १९ एप्रिल संध्याकाळी मुंबईवरुन रवाना झाली होती. या रेल्वेला विशाखापट्टनमला पोहचण्यासाठी बराच कालावधी लागला यामुळे राज्यात ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचायला उशीर झाला आहे. ही रेल्वे रखडल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता.


- Advertisement -

हेही वाचा : Oxygen Shortage: महाराष्ट्रासाठीची ऑक्सिजन एक्सप्रेस का रखडली ? दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करा, शिवसेना खासदाराचे पंतप्रधानांना पत्र


 

- Advertisement -