Oxygen Shortage: महाराष्ट्रासाठीची ऑक्सिजन एक्सप्रेस का रखडली ? दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करा, शिवसेना खासदाराचे पंतप्रधानांना पत्र

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना जबाबदार धरण्याची मागणी

Oxygen Shortage: MP Arvind savant demand High level inquiry into Oxygen Express delay, letter of Shiv Sena MP to the Prime Minister
Oxygen Shortage : महाराष्ट्रासाठीची ऑक्सिजन एक्सप्रेस का रखडली ? दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करा, शिवसेना खासदाराचे पंतप्रधानांना पत्र

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ऑक्सिजन एक्सप्रेसवरुन गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसला पोहचण्यास विलंब झाल्याने उच्चस्तरीय चौकशी करावी रेल्वेमंत्रालयात या प्रकरणी जबाबदार का धरु नये अनेक ठिकाणी थांबवले महाराष्ट्रास पोचण्यास उुशीर होतोय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झापाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. रुग्ण वाढ झाल्यामुळे ऑक्सिजन,व्हेंटिलेटर आणि औषधांची मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात दुसऱ्या राज्यातून आणण्यात येणारा ऑक्सिजन पोहचण्यासाठी जाणूनबुजून उशीर केला जात आहे. विशाखापट्टनमवरुन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात येण्यासाठी उशीर का झाला? या एक्सप्रेसला जातानाही ठिकठिकाणी आडवण्यात आले त्यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेससंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच यामध्ये रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना जबाबदार धरण्यास सांगितले आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ऑक्सिजन एक्स्पेस रखडली असल्यामुळे चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात ४० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा लवकर व्हायला हवा होता. दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करणारी टाकी लिकेज झाल्यामुळे झाकीर हुसेन रुग्णालयात २४ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ऑक्सिजन परुवठ्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायदेशीर पाठपुरावा करुन केंद्राकडे मदत मागितली आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा सैन्य दलाच्या मार्फत विमानाने करण्यात यावा अशीही मागणी केली होती. तसेच दाक्षिणात्या राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेतर्फे मुंबई कळंबोली विशाखापट्टनमकडे ऑक्सिजन टँकर ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन कळंबोली येथून ८ वाजता रवाना झाल्यावर रात्री ८.३० वाजता अकोला येथे पोहचली त्यानंतर ५० ते ५५ तासांनी विशाखापट्टनमला पोहचली आहे. महाराष्ट्राला तातडीने ऑक्सिजनची गरज असताना ट्रेन लवकर पोहचायला हवी होती परंतु ट्रेन पोहचण्यास उशीर झाला आहे. रेल्वेने ग्रीन कॉरिडॉर केले असतानाही ठिकठिकाणी ट्रेनला थांबवण्यात येत होते.

ऑक्सिजन एक्सप्रेसला थांबविण्यात आल्यामुळे विशाखापट्टनमला ट्रेन उशीरा पोहचली यामुळे आता मुंबईला २५ तारखेला ऑक्सिजन पुर्ण १ आठवड्यानंतर मिळेल. यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेसला पोहचण्यास विलंब झाल्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना जबाबदार धरण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.