घरताज्या घडामोडीOxygen Shortage: ऑक्सिजन पुरवठ्यावरुन खोटे बोलणे थांबवा, काँग्रेसची फडणवीसांवर टीका

Oxygen Shortage: ऑक्सिजन पुरवठ्यावरुन खोटे बोलणे थांबवा, काँग्रेसची फडणवीसांवर टीका

Subscribe

.. हा तर मोदी सरकारचा धूर्तपणा

महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले होते. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीसांनी ऑक्सिजन पुरवठ्याची यादी दाखवत महाराष्ट्राला १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा केंद्राने केला असल्याचे म्हटले आहे यावर सचिन सावंत यांनी १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राची निर्मिती असल्याचे सांगितले आहे. तसेच मोदी सरकारने केवळ ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तसेच राज्य सरकारला केंद्रकडून ५०० मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजन पुरवठा करायचा होता परंतु ३४५ टन दिवसाला मिळत आहे. उरेलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे. त्यामुळे भाजपने खोटे बोलणे थांबवा असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

काय म्हटलंय सचिन सावंत यांनी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. यामध्ये तथ्य असे आहे की, महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे १२५० मे.टन आहे. केंद्राच्या मान्यतेने प्राप्त असलेला ऑक्सिजन केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेला ऑक्सिजन भिलाई ११० मे.टन /दिन, बेलारी ५० मे.टन /दिन, जामनगर १२५ मे.टन/दिन, व्हायजॅग – ६० मे.टन सरासरी, ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदा ११० मे.टन आणले असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

एमव्हीए सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १७५०० मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु ३४५ मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे. भाजपने कृपया खोटे बोलणे थांबवा असेही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते

महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -