घरमहाराष्ट्रसोलापूर : मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीचा स्फोट

सोलापूर : मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीचा स्फोट

Subscribe

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी...

सोलापूर शहरातील मार्कंडेय सहकारी हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी, या भयानक स्फोटात काही रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा दावा तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान ऑक्सिजनच्या टाकीच्या स्फोटाची दुर्घटना समजताच तेथे अग्निशामक दलाच्या दोन बंबांच्या गाड्या तातडीने उपस्ठित झाल्या आणि पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. याशिवाय हॉस्पिटलमधील रुग्ण दुर्घटनेनंतर लगेचच बाहेर पडले आहेत. मार्कंडेय हॉस्पिटलच्या आवारात ऑक्सिजनच्या टाकीच्या दोन टाक्या आहेत.

या ऑक्सिजनच्या प्लांटमधील एक टाकी चालू तर दुसरी टाकी बंद होती. यातील बंद असलेल्या टाकीत रासायनिक अभिक्रियेमुळे भयानक स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये टाकीच्या आतील पावडर पाचशे फुटांपर्यंत उडाली . त्यामुळे हवेत धुळीचे लोळच्या लोळ उडाले असून, ही पावडर रुग्णांच्या अंगावरही पडली. या धक्कादायक घटनेनंतर मार्कंडेय हॉस्पिटलच्या वातावरणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यावेळेस नेमके काय झाले याचा रुग्णांना थांगपत्ताही लागला नव्हता तरी सर्व रुग्ण जीव मुठीत घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. या दुर्घटनेमुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र या स्फोटाबद्दल मार्कंडेय हॉस्पिटलने अधिकृत स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणाचे नेमके कारण पोलीस तपासांत पुढे येईल.

- Advertisement -

हेही वाचा – ‘फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच’; राऊतांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -