घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या मुख्य सचिवांची मागणी केंद्राकडून मान्य, रेल्वेतून होणार ऑक्सिजनचा पुरवठा

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांची मागणी केंद्राकडून मान्य, रेल्वेतून होणार ऑक्सिजनचा पुरवठा

Subscribe

आता रेल्वेतून होणार ऑक्सिजनचा पुरवठा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ ही मोहिम देखील हाती घेतली आहे. मात्र, तरी देखील राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे इतर राज्यातून होणारा वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्फत करावा, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांनी केली होती. त्या मागणीला आता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या गाड्यांमधून महाराष्ट्र राज्याला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होणार आहे.

महाराष्ट्र राज्याला रेल्वेच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार आता मालगाडीत थेट ट्रक, टँकर ठेवले जातील आणि राज्यातील रॅम्प असलेल्या ठिकाणी हे ट्रक, टँकर उतरवले जातील. त्यानुसार मुलुंड, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कळंबोली या ठिकाणांचा समावेश यात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्र्यांनीही केली होती मागणी

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनीही ऑक्सिजनची मागणी केली होती. सध्या महाराष्ट्र राज्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करावा. तसेच रेल्वेद्वारे ऑक्सिजनची वाहतुक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या मार्गातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास उशीर होतो. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेच्या मार्गातून करावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती.


हेही वाचा – कोरोना कहराने पुण्यात एकाच घरात १५ दिवसात पाच जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -